मारहाण, लुटमार प्रकरणी एकावर गुन्‍हा

0
56

भोसरी, दि. 27 (पीसीबी) : एकाला मारहाण करून त्‍याच्‍या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना गव्‍हाणे वस्‍ती, भोसरी येथे रविवारी रात्री सव्‍वादहा वाजताच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी एकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

संदेश रमेश गव्हाणे (वय ३५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. सचिन बाळासाहेब मुळे (वय ४४, रा. जय मल्हार किराणादुकानाच्या पाठीमागे, गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मुळे याने फिर्यादी गव्‍हाणे यांना शिवीगाळ केली. तुला सांगितले होते बाहेर जायचे नाही, असे बोलून थांब तुला आता दाखवितो माझी किती पोहच आहे, असे म्‍हणत कानाखाली जोरात हाताने मारून मारले. आरोपी मुळे याने त्‍याच्‍या जवळ असलेले टोकदार वस्तुने हाताच्‍या बोटावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी गव्‍हाणे यांना जिवे मारणाच्या प्रयत्न करून त्यांचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.