मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून चाकुने वार

0
335

खेड, दि. २९ (पीसीबी) – मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही चाकुने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना खेड मधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि.28) दुपारी घडली.

याप्रकरणी रमेश सुरेश भोसले (वय 55 रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यद दिली आहे. यावरून कृष्णा गणेश भोसले (रा. लांडेवाडी) याच्यावर खुनाच्या प्रयक्नाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने मारहाण केली होतीय या मारहाणीचे कारण विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकुने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.