मारहाण करून हातगाडी चालकाला लुटले

0
172

वाकड, दि. २४ (प्रतिनिधी) – मारहाण करून हातगाडी चालकाच्‍या गळ्यातील सोन्‍याचा बदाम आणि रोख रक्‍कम चार चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास नखाते चौक, रहाटणी येथे घडली.

विकासकुमार छडू महतो (वय २६, रा. ज्योतीबा मंगल कार्यालयाशेजारी, काळेवाडी) यांनी मंगळवारी (दि. २३) याबाबत वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पवन जाधव, कांद्या, पुष्पा (पूर्ण नाव माहिती नाही. रा. रहाटणी) आणि प्रणव जाधव (रा. काळेवाडी) अशी गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महतो यांचा हातगाडीचा व्‍यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी ते व्‍यवसाय करीत असताना आरोपी तिथे आले. त्‍यांनी महतो यांना हाताने मारहाण करुन गळयातील लाल धाग्यातील १४ हजार रूपये किमतीचे ०२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम व ३०० रुपये रोख असा एकूण १४ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्‍तीने चोरून नेला. तसेच हवेत कोयता फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण केली.