मारहाण करून तरुणाला लुटले

0
173

तळवडे, दि. ३० (पीसीबी) – दुचाकीवरून जाणा-या तरुणाला टोळक्याने मारहाण करून लुटले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री शिवरकर चौक, त्रिवेणीनगर तळवडे येथे घडली.

अभिषेक प्रेमराव गायकवाड (वय 19, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार शिंदे, अनिल अरूण नाटेकर (वय 21), चैतन्य चंद्रशेखर जावीर (वय 23), पवन लष्करे, सारंग हरिभाऊ शिळवणे (वय 19) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह मित्राकडून उसने घेतलेले 1 हजार 750 रुपये आणि मोबाईल फोन देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. यावेळी शिवरकर चौक त्रिवेणीनगर येथे आरोपींनी फिर्यादीला अडवले. त्यांना हाताने मारहाण केली व त्यांच्या खिशातून जबरदस्ती 1 हजार 750 रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या दुचाकीची लाकडी दांडक्याने तोडफोड करून 5 हजार रुपयांचे नुकसान केले. पोलिसांनी ओमकार, अनिल, चैतन्य, सारंग यांना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.