पिंपरी, दि. २८ – मामाच्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने पाच जणांनी मिळून एका 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री दहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.
नन्या ठोकळ (वय 18), जुनैद शेख (वय 19), कृष्णा बॉक्सर (वय 20), रोहित रोकडे (वय 18), राहुल रोकडे (वय 19, सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी सतरा वर्षीय मुलाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाच्या मुलाला का मारले, असा जाब फिर्यादी मुलाने नन्या ठोकळ याला विचारला. त्या रागातून नन्या ठोकळ आणि त्याच्या साथीदारांनी मिळून फिर्यादीस लोखंडी कोयता, लाथा बुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.