दि.१२(पीसीबी)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची आज मुंबईत बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली. आजच्या या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबई पोहोचले होते.
मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्टसोबत GCC Global Capability Centers (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर) हा महत्वकांशी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात उभारण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.







































