मामा भाचे दारू प्‍यायला बसले; दारूच्या नशेत मामानेचं……

0
74

चाकण, दि. १९ (पीसीबी) : दारूच्या नशेत मामाने भाच्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी रासे गावात उघडकीस आली.

संदीप खांडे (वय 40, रा. ठाकर वस्ती, रासे) असे खून झालेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी मामा सुरेश मेंघळ (वय 36, रा. ठाकर वस्ती, रासे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी दोघेही चुलत मामा भाचे आहेत. मागील काही दिवसात त्यांच्यात दारू पिल्यानंतर वाद झाला होता. बुधवारी रात्री पुन्हा दोघांचे दारू पिल्यानंतर भांडण झाले. भांडणात सुरेश याने भाचा संदीप याचा खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी हे मामा भाचे वाद्य वाजविण्‍यासाठी मुंबईला गेले होते. त्‍यांना प्रत्‍येकी 440 रुपये मानधन मिळाले. त्‍यामुळे बुधवारी ते पुन्‍हा दारू प्‍यायला बसले. त्‍यावेळी त्‍यांच्‍यात पुन्‍हा भांडण झाले. यामुळे संतापलेल्‍या मामा सुरेश मेंघळ यांने सरपणाचा ओंडका संदीप खांडे याच्‍या डोक्‍यात मारला. यामुळे संदीप हा गंभीर जखमी झाला. त्‍यानंतर आरोपी सुरेश याने गळा दाबून संदीप याचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चाकण पोलिसांनी तपास करत भाचा सुरेश मेंघळ याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.