मानसिक सुदृढतेसाठी खेळांची आवड जोपासावी – हर्षवर्धन पाटील

0
13

‘युवोत्सव २०२५’ मध्ये पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालयांचा विजय

पिंपरी, दि. 2 ( पीसीबी ) – जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण होईल. पालकांनीही याकडे जागरूकपणे पाहण्याची आवश्यकता आहे. सर्वांगीण विकास साधत देशाची भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची जबाबदारी आहे, असे मत पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव २०२५’ या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) पारितोषिक वितरण समारंभाने झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.
दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, आरजे अक्षय यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण १४५ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –
फुटबॉल – प्रथम क्रमांक – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, उपविजेते – श्री बालाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आकुर्डी;
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – प्रथम – डी. वाय. पाटील आयएमएस, आकुर्डी, उपविजेते – पीसीसीओई, निगडी, डी. वाय. पाटील कॉलेज, तळेगाव;
बॉक्स क्रिकेट (महिला) – प्रथम – पीसीसीओईआर, रावेत, उपविजेते – झील कॉलेज, इंदिरा कॉलेज;
बॅडमिंटन (पुरुष) – प्रथम – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन), उपविजेते – रितेश निम्हाळ (पीसीसीओई, निगडी);
बॅडमिंटन (महिला) – प्रथम परिनीत मगदूम (बाबुरावजी घोलप कॉलेज, सांगवी), उपविजेते – अमृता गाडेकर (एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय);
व्हॉलीबॉल – प्रथम मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर; उपविजेते – पीसीसीओई निगडी, के. बी. पी. सातारा
वैयक्तिक विजेते – बॅडमिंटन (पुरुष) – सर्वोत्तम स्मॅशर – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन),; बॅडमिंटन (महिला) – सर्वोत्तम स्मॅशर मिहिका ठाकूर (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन);
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – सर्वोत्तम फलंदाज – आदर्श पवार (डीवायपी आयएमएस); सर्वोत्तम गोलंदाज – प्रथमेश नाथे (पीसीसीओई), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – अभिषेक कोठावदे (डीवायपी आयएमएस);
बॉक्स क्रिकेट (महिला) – सर्वोत्तम फलंदाज – श्रेया टाकळकर (पीसीसीओईआर); सर्वोतम गोलंदाज – आदिती बिरादर (इंदिरा कॉलेज);
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – कल्याणी कोळपे (पीसीसीओईआर); व्हॉलीबॉल – सर्वोत्तम सेंटरर – विकास भामरे,
सर्वोत्तम ब्लॉकर – संस्कार पावरे, सर्वोत्तम स्मॅशर – विनीत शिंदे;
फुटबॉल – सर्वोत्तम गोलकीपर – ललित डोगरा (श्री बालाजी), टॉप गोल स्कोरर – यश गटकळ (डीवायपी सीओई), सर्वोत्तम खेळाडू – प्रेम भयार (गरवारे).

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या युवोत्सवात समन्वयक म्हणून प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. अमरीश प‌द्मा यांनी काम केले. माजी वि‌द्यार्थी समन्वयक नंदलाल पारीक, विशाल निकम आणि अभिजीत नायडू यांचे सहाय्य लाभले. तसेच, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी परिषद सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.