मानव जातीच्या कल्याणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयुष्य होम

0
294

पिंपरी, दि. २ (पीसीबी) आपल्या पिपंरी चिंचवड चे सर्व नागरिकां च्या उत्तम आरोग्य दीर्घायू व प्राण शक्ती वृद्धि सुख शांती साठी आर्ट ऑफ लिव्हिंग वेदिक धर्म संस्थान तर्फे संत तुकाराम महाराज मंदिर, संत तुकाराम नगर येथे वर्षअखेर आणि दुर्गाष्टमी विशेष शक्तिशाली भक्ती की लेहेर सेवा प्रोजेक्ट अंतर्गत आयुष्य होम आयोजीत केला होता.

सुमारे २२५ भाविकांनी सहभाग घेतला. सर्वांना मंत्र शक्ती चा अमूल्य गहन ध्यानाचा अनुभव आला. कित्येक आजारी व्यक्तींना ह्या हवन नंतर स्पुर्थी पूर्ण व उर्जावन वाटू लागले आहे.

वर्ष अखेर आपण नशे मध्ये धुंद कित्येकांना पाहतो.. पण आर्ट ऑफ लिव्हिंग चे हे स्वयंसेवक अध्यात्मिक अश्या सात्विक वातावरणात बेधुंद झालेलं नेहेमी दिसतात. या शक्तीशाली आयुष होम चे आयोजन सचिन नाईक, ऐश्वर्या मुलगे, रवी सकाटे, अमेय जोशी, ऋतुजा कांबळे, जयेश जैन, संतोषी कांबळे, अजिंक्य कांबळे, गणेश धाळपे अथर्व धालपे, वर्षा जैन, जितेंद्र जैन, राजेश्वरी गवलिकर, योगिता धाळपे ह्यांनी केले. हवन वेद पंडित सूरज कुलकर्णी ह्यांनी केले. सुमधुर सत्संग गायक ऐश्वर्या मुलगे, गणेश भुजबळ आणि तबला वादक तानाजी टिंगले ह्यांनी केले.

वर्षअखेर सर्व नकारात्मकता सोडून नूतन वर्ष २०२३ ची आनंद उत्साहात सुरुवात करण्यात आली.
असे हवन, पूजा आपण आपल्या घरी, मंडळ, सोसायटी मध्ये ही आयोजित करू शकतो.आर्ट ऑफ लिव्हिंग चे वेद पंडित येऊन शास्त्रोक्त पद्धतीने सर्व प्रकारच्या पूजा होम हवन करू शकतात. त्यासाठी ९३२६१६७७६९ ह्या नंबर वर सर्व माहिती घेऊ शकता.