अमीर खान , दि. २२ पीसीबी – ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने आपल्या प्रेयसी गौरी स्प्रॅटची (Gauri Spraft) माध्यमांसमोर ओळख करून दिली. त्यांचं नातं दीड वर्षांपूर्वी सुरू झालं असलं तरी, ते एकमेकांना तब्बल 25 वर्षांपासून ओळखत आहेत. या खुलास्यानंतर आमिरच्या पूर्वीच्या नात्यांचीही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
सहकलाकारांशी अफेअर?
आमिर खानचे (Amir Khan) नाव बऱ्याच वेळा त्याच्या महिला सहकलाकारांशी जोडले गेले आहे. एका जुन्या मुलाखतीत लेहरेन (Lehren) या माध्यमाला दिलेल्या संवादात त्याने या सर्व अफवांबाबत स्पष्टपणे मत मांडले होते. त्याने सांगितले की, “माझं माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोबत अफेअर आहे, जुही चावला (Juhi Chawla) सोबत नातं आहे, मी पूजा भट्ट (Pooja Bhatt) ला लग्नाची मागणी घातली आहे, अशा अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. पण अशा गोष्टींनी मी कधीच विचलित झालो नाही.”
1986 साली आमिरने रीना दत्ताशी (Reena Dutta) लग्न केलं होतं. त्यांना दोन मुले – जुनैद आणि आयरा आहेत. मात्र, हे नातं 2002 मध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर आमिरने 2005 मध्ये चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) हिच्याशी लग्न केलं. 2011 मध्ये त्यांच्या घरी आझादचा जन्म झाला. 2011 मध्ये आमिर आणि किरण वेगळे झाले असले तरी ते आजही सहपालक म्हणून एकत्र आहेत आणि व्यावसायिक प्रोजेक्ट्सवरही काम करत आहेत.
गौरी स्प्रॅटबाबत खुलासा-
सध्या आमिर खान (Amir Khan) आणि गौरी स्प्रॅटच्या नात्याची पुष्टी झाल्यानंतर, गौरीबद्दल अधिक माहिती पुढे आली आहे. गौरी स्प्रॅट विवाहित असून, तिचा घटस्फोट झालेला आहे. काही माध्यमांनुसार, तिला सहा वर्षांचा एक मुलगा आहे आणि ती सध्या बेंगळुरूमध्ये त्याच्यासोबत राहते. गौरी एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत असून, फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे.
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने आपल्या प्रेयसी गौरी स्प्रॅटची (Gauri Spraft) माध्यमांसमोर ओळख करून दिली. त्यांचं नातं दीड वर्षांपूर्वी सुरू झालं असलं तरी, ते एकमेकांना तब्बल 25 वर्षांपासून ओळखत आहेत. या खुलास्यानंतर आमिरच्या पूर्वीच्या नात्यांचीही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.