माधव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ‘मुख्य प्रवक्ता’ पदी

0
374

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते माधव पाटील यांना पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी युवक प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहर समिती सदस्य काशिनाथ जगताप, समिती सदस्य आणि युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ उपस्तिथीत होते.

नगरपालिकेत गेले वर्षभर प्रशासन कारभार पाहत आहे. आज शहरात कोणताही पक्ष हिरहिरीने जनतेची बाजू घेउन आंदोलन करत नाही किंवा बाजू मांडताना दिसत नाही. सगळेच पक्ष शांत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाची लोकांच्या प्रश्नावर काय भूमिका आहे, हे प्रशासन आणि राज्य सरकारला सांगणार,असे नवनियुक्त मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले. माधव पाटील यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला पहिल्यांदाच वकिल, इंजिनियर,एमबीए,एमए शिक्षण घेतलेले उच्चाशिक्षित असे ‘मुख्य प्रवक्ता’शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळाले आहे.

राष्ट्रवादी व्यापारी आणि उद्योग सेलचे अध्यक्ष विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे,भालदार,राजू खंडागळे,अनिल भोसले, संदीप चव्हाण,ज्योती जाधव, संजीवनी पुराणिक, सागर भुजबळ, नितीन बुगासे, नितीन मोरे,संदीप मोरे,वैशालीताई पवार आदी उपस्तिथ होते.