मादी श्र्वानाला डांबून ठेवून ठार मारले

0
2

हिंजवडी, दि. 23 (पीसीबी) : मादी श्वानाला दाबून ठेवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार नेरे दत्तवाडी येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार ऍनिमल वेल्फेअर ट्रस्टच्या शेल्टर मध्ये 5 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत घडला.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टचे फाउंडर रोहित चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी रोहित चौधरी यांना बारा हजार रुपये देऊन मादी श्वान सांभाळण्यासाठी दिले. त्यानंतर फिर्यादीने श्र्वानाचा फोटो पाठवण्यास आरोपीला सांगितले. मात्र फोटो पाठवण्यास आरोपीने टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी श्वानाचे पॅम्प्लेट लाऊन श्र्वानाचा शोध घेतला. त्यावेळी आरोपीच्या शेल्टर जवळ एका व्यक्तीने शेल्टर पासून 200 मीटर अंतरावर मयत श्वान दाखविला सांभाळण्यास दिलेल्या श्वानाचा सांभाळ न करता तिला दाबून ठेवून ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.