माझ्या बायकोला तुमच्यासारख्याच पाटल्या करायच्या आहेत महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

0
227

चिखली, दि. १० (पीसीबी) – माझ्या होणा-या बायकोला तुमच्या सारख्या बांगड्या करायच्या आहेत, असे म्हणत महिलेचा विश्वास संपादन करून महिलेच्या साडेचार लाखांच्या बांगड्या घेऊन दोघेजण पसार झाले. हा प्रकार शनिवारी (दि. 9) दुपारी आकुर्डी-चिखली रोडवरील सुदर्शननगर येथे घडला.

याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना एकजण त्यांच्याकडे आला. त्याने फिर्यादी यांना, माझे लग्न ठरले आहे. तुमच्या हातातील बांगड्या मला दाखवा. तुमच्या सारख्या बांगड्या मला माझ्या होणा-या बायकोला करायच्या आहेत. तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या मला त्याचे फोटो काढून घ्यायचे आहेत, असे म्हणून बांगड्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादी यांची दिशाभूल करून चार लाख 40 हजार रुपये किमतीच्या 11 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन दोन्ही आरोपी पळून गेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.