मोशी, दि. २३ (पीसीबी) – माझ्या घरच्यांचे फोन का उचलते मनात पतीने पत्नीला लाटण्याने व बकेट ने मारहाण केली आहे या प्रकरणी पत्नीने थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार रविवारी व शनिवारी मोशी येथे घडला.
याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सत्यवान सर्जेराव कच्चे (वय 38 रा.मोशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या आईचा फोन उचलला याचा राग आल्याने आरोपीने तू माझ्या घरच्यांचा फोन का उचलते म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यास व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादी यांचे वडील हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.









































