माझ्यासोबत फोटो काढला नाही, तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड फेकेल – अल्‍पवयीन मुलीला धमकी

0
88

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : तू माझ्यासोबत फोटो काढला नाही तसेच मला फोन किंवा मेसेज केला नाही तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड फेकेल, अशी धमकी एका तरुणाने अल्‍पवयीन मुलीला दिली. ही घटना मंगळवारी (दि. २२) रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास क्रांती चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

मयुर मोहन जाधव (वय २८, रा. शितल हॉटेल जवळ, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अल्‍पवयीन मुलीच्‍या आईचा मोबाइल बिघडल्‍याने त्‍या दुरूस्‍तीसाठी जवळच्‍या एका दुकानात घेऊन गेल्‍या होत्‍या. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या आरोपी मयुर याने तिच्‍याकडे मोबाइल मागितला. मात्र तिने मोबाइल देण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे आरोपी तेथून रागाने निघून गेला. फिर्यादी अल्‍पवयीन मुलगी घरी जात असताना अंधारात रिक्षात बसलेल्‍या आरोपी मयुर याने तिचा हात पकडून रिक्षामध्‍ये ओढले. त्‍या मुलीने विरोध करीत आरडा ओरडा केला असता आरोपीने तिच्‍या कानाखाली मारली. तू माझयासोबत फोटो काढला नाही तसेच फोन किंवा मेसेज केला नाही तर तुझया तोंडावर ॲसिड फेकेल, अशी धमकी दिली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.