पुणे, दि. 30 (पीसीबी) : बाबा आढावा यांनी पुण्यात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतकं मोठं यश कसं मिळालं यामध्ये नक्कीच काही तरी घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बाबा आढाव यांनी पुण्यात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केलंय. अनेक विरोधकांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार हे देखील आज बाबा आढाव यांची भेट घेण्यसाठी पोहोचले. अजित पवार यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केलीये.
बाबा आढाव यांनी यावेळी म्हटले की, कोर्टात मार्ग निघत नाही म्हणून जनआंदोलन केलं जातं. त्याने केलं म्हणजे आम्ही केलं असं होत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. फक्त ते दडपू नका. तसा शब्द द्या. आतापर्यंत खूप दडपण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या जजपेक्षा मला जनतेची न्यायबुद्धी महत्त्वाची आहे. आमचं आंदोलन चिरडलं जाऊ नये. नाही तर चिघळलं जाईल. चळवळी उभ्या करणं आमचं काम आहे. हे आंदोलन सुरू झालं. त्यात विधायक बाजू आहे. चळवळीच्या हक्काच्या बाजू आहेत. ते चिरडलं जाऊ नये. अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली.
आंदोलन चिरडलं जाणार नाही – अजित पवार
‘यावेळी अजित पवारांनी त्यांना शब्द दिला की, आंदोलन हे चिरडलं जाणार नाही. त्यांना मी विनंती केलीच आहे. आंदोलन मागे घेण्याची. उद्धव ठाकरे येणार आहेत. इतर नेतेही येणार आहेत. मी कलेक्टर, सीपी आणि सर्व अधिकारी आणले. त्यांनाही सांगेल. आंदोलन चिरडलं जाणार नाही. आमच्याकडून असं काही होणार नाही’
‘बॅलेट पेपरवर मतदानाच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, यावर अनेकवेळा चर्चा झालीये. आपण संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मानतो. कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही काय करणार आहे. उलट बॅलेटपेपरवर गंमत असायची. आम्ही ९१ ची निवडणूक बॅलेट पेपरवर लढवली. उलट मशीनवर चांगलं आहे. कुणाला किती मिळाले पटकन कळतं. आम्ही काही मशीनचा आग्रह धरला नाही. बॅलेट पेपरवर घेतली तरी आम्हाला काही अडचण नाही. पण कोर्टानेच निर्णय दिला आहे. तो त्यांचा अधिकार आहे.’