माझ्याशी लग्न कर, म्हणत नातेवाईकाकडूनच तरुणीचा विनयभंग

0
41

भिगवण, दि. 28 (पीसीबी) : इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे नातेवाईकाकडूनच तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याघटनेबद्दल फिर्याद तरुणीने भिगवण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आत्याच्या मुलाने फिर्यादीचा हात धरुन तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत तरुणीवर विनयभंग केला. तसेच हातातील कोयत्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या एकाने फिर्यादीच्या भावाला धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सचिन कुमार मंचरे (रा.बंडगरवाडी (पोंधवडी) ता. इंदापूर जि. पुणे), दिपक राहीज (वय 32, रा. राहीजवाडी, काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपाली खेत्रे करीत आहेत.