माझी वसुंधरा स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

0
362

पिंपरी, दि. ४ मे २०२३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ३.०” या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) च्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला सोमवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ४१ हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

पीसीसीओईच्या वतीने संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि धनादेश स्वीकारला. यावेळी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. संदीप माळी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. दिनेश कुटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.