माजी स्वीकृत नगरसेवक संतोष गुलाब बारणे यांचा आंदोलनाचा इशारा

0
223

थेरगाव मधील महापालिकेच्या काही महत्वपूर्ण मिळकतीवर येत्या आठ दिवसात भूमीपुत्र सुरक्षा रक्षक न नेमल्यास


पिंपरी, दि.९ (पीसीबी) – थेरगाव प्रभाग क्र 23 मधील महापालीकेच्या अनुक्रमे कामगार नेते श्री शंकर अण्णा गावडे भवन, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा थेरगाव गावठाणातील पुतळा व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय समोरील सेल्फीपॉईंट ओपन गार्डन या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे खूप गरजेचे आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला समाज कंटकांकडून काही घात होऊ नये .
कारण असाच प्रकार काही दिवसांपूर्वी हडपसर ससाणे नगर या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या ठिकाणी घडला. सुरक्षा रक्षक नसल्या कारणाने समाजकंटकाने मूर्तीची विटंबना केली. तसेच कामगार भवन येथे शेजारीच भरपूर प्रमाणात दारूचे धंदे आहेत त्यामुळे तेथे रात्री अंधाराचा फायदा घेऊन भरपूर तळीराम दारू पिण्यास बसतात व तेथेच तोडफोड करून घाण करून ठेवतात .
म्हणून आपण वरील ठिकाणी येत्या आठ दिवसात सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्यावे अन्यथा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा माजी स्वीकृत नगरसेवक संतोष गुलाब बारणे यांनी दिला.