माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस युवानेते पार्थदादा पवार यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा.

0
385

पिंपळे सौदागर, दि. १६ (पीसीबी) – माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,गुणवंत विद्यार्थी सत्कार ,नागरिकांसाठी मोफत हेल्थ कार्ड वाटप कॅम्प अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वतंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिम्मित रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील टॉपर्स प्री स्कूल, हॉली इंग्लिश स्कूल,रोझलॅडं सोसायटी,अल्कोव्ह सोसायटी,वसंत अव्हेन्यू , प्राईम प्लस सोसायटी,द क्रेस्ट,राजवीर पॅलेस, द्वारका क्वीन्स पार्क, किंगस्टोन अव्हेन्यू ,अशा विविध सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाऊंडेशन व नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटल पिंपरी व डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे संकलन करण्यात आले होते. तसेच पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव,रावेत, किवळे, काळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी मोफत हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सदरील हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन युवा नेते उमेश काटे, सागर खंडूशेठ कोकणे, प्रशांत सपकाळ , कामेश तरस, प्रसाद तरस, सचिन काळे यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थदादा अजितदादा पवार, डीवायएसपी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंतभाऊ गावडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट,, मा.महापौर संजोग वाघेरे पाटील , योगेश बहल, हभप.पुरुषोत्तम महाराज पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मा.उपमहापौर प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, राहुल कलाटे, मयूर कलाटे, तुषार कामठे, संतोष कोकणे, विनोद नढे, स्वाती माई काटे, राजू बनसोडे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, चंद्रकांत नखाते, कैलास बारणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, बांधकाम व्यावसायिक सुनील आडवाणी , मनोहर फेरवानी, नरेश वाधवानी, विनोद चांदवाणी, श्रीशेठ आसवानी ,चांदी शेठ, काळूशेठ मतानी, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तिकोने , राजेंद्र जगताप, अतुल शितोळे ,निलेश पांढरकर, शेखर ओव्हाळ, सनी ओव्हाळ, रमाताई ओव्हाळ, युवा नेतेशाम जगताप, तानाजी जवळकर,, निलेश डोके ,राम वाकडकर ,शेखर काटे, पै.किशोर नखाते ,सचिन काळे , कुणाल थोपटे, बापू कातळे, विशाल काळभोर, सागर कोकणे, प्रशांत सपकाळ, यांच्यासह परिसरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व शहारातील नागरिक उपस्थित होते.