माजी रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी काळाच्या पडद्याआड

0
26

पुणे, दि. ६ – पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. ते सक्रिय राजकारणातूनही दूर होते. सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. सुरेश कलमाडी यांनी मोठा काळ राजकारणात गाजवला. क्रीडा क्षेत्रातही मोठे काम सुरेश कलमाडी यांचे राहिले आहे. काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने मोठा धक्का लोकांना बसलाय. पुण्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सुरेश कलमाडी पुण्यातील राजकारणात सक्रिय होते. आपले अर्धे आयुष्य कलमाडींनी राजकारणात घालवले. सुरेश कलमाडी यांच्या निधनाबद्दल कळताच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. आज दुपारी 2 वाजता सुरेश कलमाडी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल.

सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सुरूवात केली. त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार हेच नाही तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील होते. पक्षानेही वेळोवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपावल्या. पुण्याचे नाव लाैकिक त्यांनी जगभरात पोहोचवले.

सुरेश कलमाडी यांनी १९३५ साली पाकिस्तान आणि १९७१ मध्ये बांगलादेश तेव्हायाच पूर्न पाकिस्तान विरोधात भारतीय वायूसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावले होते. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून इंडियन एअर फोर्समध्ये १९६० मध्ये दाखल झाले होते. अनेक वर्ष त्यांनी देशासाठी सेवा बजावली. १९७४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्विकारली आणि ते राजकारणात दाखल झाले. १९९० पासून कलमाडी यांनी पुणे शहरात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. सलग तीन टर्म राज्यसभा सदस्या आणि नंतर पुणे शहरातून काँग्रेसकडून लोकसभेवर खासदार म्हणून ते विजयी झाले होते,.शरद पवार यांचे नवी दिल्लीमधील विशेष सहकारी म्हणून त्यांचा परिचय सर्वश्रृत होता.
पुणे शहरात गणेश फेस्टीव्हल त्यांनी सुरू केला आणि आजही ती परंपरा अखंडपणे सुरू आहे.