माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन

0
60

दि. 13 (पीसीबी) – माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान याचे निधन झाले आहे. समीर खान यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.

समीर खान यांचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नी निलोफर यादेखील त्यांच्या सोबत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान आणि त्यांचे जावई समीर खान हे कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात नियमित तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी बाहेर पडले.

रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर समीर खान यांनी कारचालकाला गाडी काढण्यास सांगितली. त्यावेळी गाडीत बसत असताना ते कार चालकाचा पाय चुकून अ‍ॅक्सलरेटवर पडल्यामुळे समीर खान गाडीसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेले होते.

अपघातावेळी कार ‘एचडीआयएल’ वसाहतीच्या संरक्षण भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्यांच्यावर ‘आयसीयू’त उपचार सुरू होते. तर, निलोफर यांच्याही हाताला दुखापत झाली होती. यात ते गंभीर जखमी झाले. कारचालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गेल्या काही दिवसापासून समीर खान यांच्यावर ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांचा उपचार सुरु असतना मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. त्यांच्या मेंदूत गाठ झालेली आणि बरगडी, खांदा आणि मानेला अनेक फ्रॅक्चर झाले होते.