माजी प्र.कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे निधन

0
4

पुणे, दि. ६ दि . ६ ( पीसीबी ) – पुणे विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे काल (शनिवार, ५ जुलै) संध्याकाळी निधन झाले. डॉ. नवलगुंदकर हे मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू आणि रा.स्व.संघाचे पूर्व पुणे विभाग मा. संघचालक होते.

डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर (२७ सप्टेंबर, १९३५: संगमनेर, महाराष्ट्र – ) हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांचे मूळ गाव संगमनेर असून त्यांचे वडील तेथे संस्कृतचे शिक्षक होते. शालेय शिक्षण संगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे संस्कृतऐवजी अर्थशास्त्र विषय घेऊन नवलगुंदकरांनी पदवी मिळवली. त्यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर पीएच.डी.ची पदवी मिळवली.

१९५८ च्या सुमारास नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय (आत्ताचे भारत हायस्कूल) येथे इंग्लिश आणि गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यावरही ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवीत. नवलगुंदकर २०१६पासून संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष होते.