पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेविका शोभाताई गुरमितसिंग आदियाल (वय – ६५) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने जुपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेत वाकड पिंपळे गुरव प्रभागातून २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर त्या नगरसेविका झाल्या होत्या. महिला बाल कल्याण सभापती तसेच झोप़डपट्टी सुधार समिती सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिले. आज सायंकाळी चार वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.