माजी नगरसेविका आशा शेंडगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
18

पिंपरी, दि.२ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अभ्यासू, आक्रमक माजी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अफाट जनसंपर्क आणि सतत सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या सौ. शेंडगे यांच्या प्रवेशाने या प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.

स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सारंग कामतेकर, तानाजी धायगुडे यावेळी उपस्थित होते.

महापालिकेत एकदा शिवसेना आणि नंतर भाजपमधून असे सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेल्या आशा शेंडगे या गेली तीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कार्यात आघाडीवर आहेत. कासारवाडीचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पेशाने शिक्षिका असलेल्या शेंडगे यांची अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणे सर्व राजकारणी तसेच विचार करायला लावणारी असतात. एन दिवाळीच्या काळात केबलसाठी रस्ते खोदाई करून नागरिकांची गैरसोय केली म्हणून महापालिका आयुक्तांच्या कक्षाबाहेर त्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसाठी केलेले आंदोलन गाजले.