माजी नगरसेवक पोपट जम यांचे निधन

0
150

पिंपरी दि. १९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक पोपट जम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
पोपट जम हे पिंपळेगुरव भागातून 2002 ते 2007 दरम्यान महापालिकेवर निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडून आले होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता सांगवीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.