पुणे, दि. १ ( पीसीबी ) – पुणे महापालिकेच जेष्ठ माजी नगरसेवक नितीन जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गोखलेनगर परिसरातून १९९२, १९९७ अशा सलग दोन टर्म ते नगरसवेक होते. तात्या या नावाने ते सर्वदूर परिचित होते. महापालिका प्रशासनावर अगदी आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दरारा होता. अफाट जनसंपर्क आणि आंदोलनाच्या विविध क्लृप्त्यांमुळे ते कायम माध्यमांच्या चर्चेत होते.