माजी नगरसेवक कोऱ्हाळे, ननावरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
9

पिंपरी चिंचवडचे दोन माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे. पक्षाच्या विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन सहकारी निश्चितच मोलाचं योगदान देतील, असा विश्वास अजितदादा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेच्या जोरावर पुढे चालला आहे