माजी नगरसेवक अशोक पारखी यांचे निधन

0
108

पिंपरी, दि. ८ (पीसीबी): भाजपचे सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक, महापिलका शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि हुतात्मा चापेकर स्मारक समितीचे सदस्य म्हणून कारकिर्द गाजवलेले अशोक पारखी (वय -७४) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कार्यरत होते.

पिंपरी चिंचवड नगरपालिका असताना १९७८ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या वतीने वाल्हेकरवाडीतून लढवली होती. भाजप नगरसेवक म्हणून १९८६ मध्ये चिंचवडगावातून ते जिंकले होते. भाजपकडूनच १९९२ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता. अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होती. महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून त्यांनी राष्ट्रवादीने संधी दिली होती. हुतात्मा चापेकर स्मारक समितीचे सदस्य म्हणून अखेर पर्यंत ते कार्यरत होते.