माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जोरदार धक्का

0
291

मंचर, दि. २४ (पीसीबी) : पुण्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील पाटल यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी या निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे.

निकम यांनी वेगळा पॅनल उभा केला आहे. त्यामुळे देवदत्त निकम यांची पक्षातून हकलपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचा आदेश न मानता निकम यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे.

दरम्यान मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये गटबाजी उफाळून आली आहे.माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच पक्षाने उमेदवारी नाकारण्यात होती. देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते.

तर ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. असं त्यांनी जाहीर केलं होतं. ते म्हणाले होते की, “राष्ट्रवादी पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दुःख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.