मुंबई, दि. 5 (पीसीबी)
शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तिकर यांचे आज अल्पश: आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. आज रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यानंतर शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.