माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट

0
49

आळंदी, दि. 28 (पीसीबी) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरू आहे. राज्यभरातून लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. याच अलंकापुरीत संजीवन समाधी सोहळ्या दरम्यान चोरट्यांनी काही भाविकांचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सारिका सतीश जोशी (वय 65, रा. पालघर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जोशी यांची इंद्रायणी घाट आळंदी येथून 29 हजार 200 रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.

त्याचबरोबर कल्पना किशोर पाटील यांचे 2500 रुपये आणि एक लाख दहा हजार रुपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, वैभवी नितीन तांडेल यांचे 6500 रोख आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, कल्पना किशोर तरे यांची 5200 रोख रक्कम देखील अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या सर्व घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी साडेआठ ते नऊ या कालावधीत घडल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.