मांस वाहतूक प्रकरणी चाकण पोलिसांची कारवाई ; दोघांना अटक

0
209

चाकण, दि. २६ (पीसीबी) – आष्टी येथे गोसदृश जनावरांची कत्तल करून ते मांस मुंबईला घेऊन जात असलेल्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 25) पहाटे चाकण-शिक्रापूर रोडवर शेलपिंपळगाव ते मोहितेवाडी फाटा येथे करण्यात आली.

अस्लम फकीर मोहम्मद शेख (वय 42), नोवीद नशीर शेख (वय 25, दोघे रा. खरशिंदे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल कोंढवळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पिकअप मध्ये गोंवंश सदृश्य जनावरांची आष्टी येथे कत्तल केली. तिथून ते मांस नालासोपारा मुंबई येथे घेऊन जात असताना चाकण पोलिसांनी टेम्पोवर कारवाई करून 1600 किलो मांसासह टेम्पो ताब्यात घेतला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.