महेशदादांचा आढळरावांना शब्द, भोसरीतून लाखाचे मताधिक्य देणार

0
260

आपल्या शब्दाला पक्केे असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी भर सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून लाखाचे मताधिक्य देण्याचा शब्द दिला. शिरूरमधून लोकसभेला तीव्र इच्छुक, पण ही जागाच पक्षाला न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आमदार महेशदादा लांडगे यांनी फेटाळून लावली आणि ही केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.

गेल्यावेळी 2019 च्या लोकसभेला आढळरावांना भोसरीने शिरूर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 37 हजार 77 मतांची व त्याखालोखाल हडपसरने आघाडी दिली. मात्र, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या बाकीच्या विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर गेल्याने त्यांचा 58 हजार 483 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या वेळी भोसरीतून एक लाखाचे लीड देऊ, असा दावा महेशदादांनी काल केला.

आमदार लांडगे यांनी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे टेन्शन कमी झाले. उमेदवार येण्याच्या अगोदर आपला चेहरा फ्रेश झाला, तर उमेदवार फ्रेश आणि आपणही असे म्हणत त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज केले. एरव्ही त्वेषाने आणि गंभीर बोलणाऱ्या महेशदादांनी काल विनोदी अंगाने जोरदार भाषण केल्याने त्याला बावनकुळे, आढळरावांसह सर्वांनीच मोठी दाद दिली.