महिलेला समजावण्यासाठी गेलेल्या महिलेस बेदम मारहाण

0
212

दि २८ एप्रिल (पीसीबी ) – माझ्या पतीला वारंवार फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेच्या कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना 17 एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली.

याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने एका महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी महिलेच्या पतीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याने तिला समजावण्यासाठी फिर्यादी महिला गेली. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादीला शिवीगाळ करून पाण्याच्या स्टीलच्या बाटलीने डोक्यात मारले. मानेच्या मागे चावा घेऊन दुखापत केली. तसेच शरीरावर ठिकठिकाणी नखे मारून ओरखडले. फिर्यादी महिलेचे मंगळसूत्र तोडून तसेच कारची काच फोडून नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.