महिलेला शिवीगाळ करत मारहाण आणि विनयभंग

0
353

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) -पाठीमागच्या कार चालकाने हॉर्न वाजवून देखील गाडी बाजूला न घेतल्याने कार चालक आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला मारहाण करत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी बावधन बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

पदमसिंह हेमंत पाटील (वय 22, सध्या रा. हिंजवडी, मूळगाव कराड, जि. सातारा), अनिकेत रामदास हात्ते (वय 23), विशाल सदानंद सुटाके (वय 22, दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 31) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांचे काम संपवून घरी जात होत्या. त्यावेळी आरोपी पदमसिंह याने जोरात हार्न दिला असता फिर्यादीने गाडी बाजूला घेतली नाही. या गोष्टीचा राग आल्याने पदमसिंह पाटील याने त्याची गाडी फिर्यादीच्या गाडीच्या पुढे नेऊन थांबवली. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून पदमसिंह आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.