चऱ्होली, दि. २४ जुलै (पीसीबी) -महिलेला विनाकारण शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.23) दुपारी चरोली येथे घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी अनिल रासकर राहणार चऱ्होली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या राहत असलेल्या जागेची साफसफाई करत गवत काढत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी तिथे आला व त्याने फिर्यादी यांना दमदाटी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी याने त्यांना प्रतिकार केला असता फिर्यादीचा गळा दाबत त्याने कानाखाली मारली. मदतीसाठी फिर्यादी यांनी पोलीसना फोन केला असता आरोपी तिथून पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












































