महिलेला पार्ट टाईम जॉब देतो म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक

0
73

रावेत, दि. ३० (पीसीबी) : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने एका महिलेची 11 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 17 मे ते 19 मे या कालावधीत शिंदेवस्ती, रावेत येथे घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9555754059 क्रमांक धारक महिला श्वेता पटेल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला फोन केला. फोनवरील महिलेने फिर्यादीस व्हाटसअपवर मेसेज करून ती ‘डीडीबी वर्ल्ड वाईड मिडीया कंपनीची एचआर असल्याचे सांगितले. फिर्यादीस गुगल मप वर रिव्ह्यू देऊन पार्ट टाईम पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळे टास्क दिले. फिर्यादीस वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यांना टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगून फिर्यादीची एकूण 11 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.