महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

0
125

वाकड, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तरुणाने एका महिलेला कारमध्ये बसविले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी ज्योतिबानगर, काळेवाडी परिसरात घडली.

कुणाल शरद मोरे (वय 30, रा. पोलीस लाइन, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी थेरगाव येथे राहणा-या 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी कुणाल याने पिडित महिलेला फोन करून भेटण्यासाठी थांबविले. त्यानंतर महिलेला कारमध्ये बसवून तिला ज्योतिबानगर, काळेवाडी येथे नेले. रस्त्याच्या कडेला कार थांबवून मला तू खूप पसंत आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे बोलून महिलेचा विनयभंग केला. तिने आरोपीला विरोध केला असता त्याने महिलेला मारहाण केली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.