महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

0
438

भोसरी ,दि. 11(पीसीबी) – एका ५७ वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यांपासून १० एप्रिल २०२३ या कालावधीत दापोडी येथे घडला.

राजेश बेलीपूरम भार्गवत (वय ५७, रा. दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एकट्या असताना तसेच त्यांच्या मुलीसोबत असताना त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीकडे बघून अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. १० एप्रिल रोजी सकाळी आरोपीने त्याचा मोबाईल नंबर लिहून फिर्यादी यांच्या दरवाजात ठेवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.