महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
409

रावेत, दि. १७ (पीसीबी) – महिलेला मेसेज करून, तिच्या नावाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेऊन तसेच तिच्यासमोरून मोठमोठ्याने गाडीचा हॉर्न वाजवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला.या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री पावणे बारा ते गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या कालावधीत घडली.

पुरुषोत्तम नागेश गुलिमी (वय 40, रा. छत्रपती संभाजी राजे नगर, कॉलनी क्रमानं तीन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादींना मेसेज केले. फिर्यादीशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या नावाचे स्टेटस आणि बदनामीकारक मजकूर आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसवर ठेवला. फिर्यादी समोरून जोरात गाडी चालवून मोठमोठ्याने हॉर्न वाजवून फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.