चिखली, दि.१२ (पीसीबी) – महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ११) दुपारी त्रिवेणीनगर चौक येथे घडली.
राजेश बलराज मुरूमकर (वय ५१, रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग केला. महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलाला ढकलून दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.










































