महिलेच्या बँक खात्यातून परस्पर सुमारे दोन लाख लंपास

0
143

वाकड, दि. ३० (पीसीबी) – महिलेच्या बँक खात्यातून परस्पर तब्बल 1 लाख 92 हजार 100 रुपये परस्पर काढून गेण्यात आले आहेत. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 25 जानेवारी रोजी घडली.

यावरून वाकड पोलिसांनी दोन अज्ञात बँक खाते धारक व zoyakhan840983@okhdfcbankया य़ुपीआय आय़डी धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. त्यांच्या परस्पर आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातून नकळत तीन ट्रान्झॅक्शन केले. यामध्ये 1 लाख 92 हजार 100 रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.