महिलेच्या परस्पर तिच्या नावावर पर्सनल लोन मंजूर करून घेतले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून ही कर्जाची रक्कम परस्पर इतर बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेत महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथे घडली.
याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला 8115281846, 8127656016 या क्रमांकावरून अनोळखी व्यक्तींनी फोन केले. महिलेकडून त्यांच्या बँक खात्याचा युजर आयडी आणि पासवर्ड घेतला. त्याचा वापर करून महिलेच्या परस्पर तिच्या नावावर 15 लाख 12 हजार 921 रुपयांचे पर्सनल लोन मंजूर करून घेतले. ही रक्कम तीन टप्प्यात आरोपींनी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












































