महिलेचे 4 तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले

0
298

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे. ही घाटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालीकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली आहे.

महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीवरील अनोळखी इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मुलीला शाळेतून घेऊन जात असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील 95 हजार रुपयांचे 4 तोळे वजनाचे मंगळसुत्र व चैन असे दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.