महिलेचे सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरले

0
429

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – रिक्षातून प्रवास करत असताना सहप्रवासी महिलेने एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी सावता माळा माळी मंदिर जाधववाडी ते डी मार्ट मोशी या दरम्यान घडली. याप्रकरणी महिलेने सहप्रवासी महिलेच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला सावता माळी मंदिर जाधववाडी ते डी मार्ट मोशी या दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या. रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सह प्रवासी महिलेने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 30 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.