महिलेचे बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीसाठी वापर

0
252

अनोळखी व्यक्तींनी एका महिलेचे बनावट फेसबुक खाते सुरू केले. त्या खात्याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला. हा प्रकार 15 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे ऑनलाइन पद्धतीने घडला.

याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेचे फेसबुक खाते हॅक केले. त्या खात्याचा विनापरवानगी ॲक्सेस घेऊन त्या खात्यावरून त्यांचे फोटो आणि इतर माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले. महिलेच्या फेसबुक फ्रेंडचे संपर्क क्रमांक मिळवून त्याचा फसवणुकीसाठी वापर केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.