महिलेची 17 लाख 27 हजारांची फसवणूक

0
241

बावधन, दि. २६ (पीसीबी) – महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेत तिची 17 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2017 ते 22 मार्च 2023 या कालावधीत बावधन आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडली.

विजयसिंग सूजभानसिंग तंवर (वय 30, रा. बावधन, पुणे. मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून 12 लाख 50 हजार रुपये रोख आणि 4 लाख 77 हजार 630 रुपये ऑनलाईन स्वरुपात घेतले. पैसे घेऊन आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.