महिलेची छेडकाढणाऱ्या रोड रोमिओला केले निर्वस्त्र… व्हिडिओ व्हायरल

0
139

पिंपरी, दि. १८ –
रोड रोमिओला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रोड रोमिओला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आधी हा व्हिडिओ शहरातील फुलेनगर भागातील असल्याचे सांगितले जात होते. हा व्हिडिओ फुलेनगर येथील नसल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

छेड काढल्यामुळे रोड रोमिओला निर्वस्त्र करून एक महिला सॅंडलने बेदम चोप देत आहे. इतर नागरिक देखील त्याला जाब विचारत महिलेची माफी मागायला लावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिलेची मारहाण होताच इतर जमलेल्या नागरिकांनी देखील रोड रोमिओला लाथांनी मारहाण केली. हा सर्व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील फुलेनगर भागातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ तिथला नसल्याचे समोर आलेले आहे. अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमादार यांनी दिली आहे.