महिलेची एक लाख 88 हजारांची फसवणूक

0
189

देहूगाव, दि. २७ (पीसीबी) – महिलेला लिंक पाठवून त्यावरून 500 रुपये पाठवण्यास सांगत एक लाख 88 हजारांची फसवणूक केली. ही घटना 12 आणि 13 एप्रिल रोजी देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फ्री लायसिंग या लिंकवर क्लिक केले. त्यावरून अनोळखी व्यक्तीला व्हाट्स अपवर आपोआप मेसेज गेला. त्यानंतर फिर्यादीच्या व्हाटसअपवर एक लिंक आली आणि एका मुलीचा फोनही आला. फोनवरील मुलीने फिर्यादी यांना व्हाट्सअपवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून 500 रुपये पाठविण्याबाबत सांगितले. दोन दिवसात फोनवरील तरुणीने फिर्यादीकडून एक लाख 88 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.